खरच आता "जय महाराष्ट्र" म्हणायला खूप लाज वाटायला लागली आहे। कारण तर सगळ्याना माहिती आहेच,
शाहू , फुले -आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला एक अप्पर जिल्हा अधिकार्याची आपले कर्त्तव्य बजावत असताना जालून निर्घुन खून केला जातो। हे अमानुष कृत्य करणार्या अरोपिना अटक तर झाली, पण पुढे काय? या मागील सर्वाना शिक्षा होणार की नाही हा ही एक मोठा प्रश्न आहे। खरतर या अरोपिनी एवढा मोठा निर्णय कसा काय घेतला असेल? त्यांच्या मागे असणारे राजकीय पाठबल हेच त्याचे उत्तर आहे।
या घटनेचा सगळ्याच थरातून निषेध होतो आहे। आणि आता यातसुधा आता राजकारण केला जाते आहे। हा प्रश्न त्या अरोपिना शिक्षा होवून सुटणार नाहीये। त्यांच्या सारखे शेकडो पोपट शिंदे आज ही महाराष्ट्रात मोकाट फिरत आहेत। त्यांचे काय? आता सगलीकडे धाडसत्र चालू आहे। पान हे जर आधीच झाल असत तर त्यात यशवंत सोनावने सारख्या कर्त्तव्य दक्ष अधिकार्याचा असा जीव गेलाच नसता नाही का ?
या आशा गोष्टी म्हणजे समाजाला लागलेली किड आहे आणि ती समूल नष्ट कशी होईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यामधे अधिक प्रगति होताना दिसते आहे। बाकीच्या सर्व राज्यापेक्षा एके काळी पुढे असणारे आपले राज्य आता सगळ्याच्या मागे तर पडणार नाही ना ?
खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला कशाच ग्रहण लागल आहे?