Wednesday, June 17, 2009

अस वाटल नव्हत....

असही कधी होईल ,
पूर्ण होण्याआधी स्वप्न तूटेल अस वाटल नव्हत....

तुला भेटल्यावर पून्हा गमावेन,
सगळ्यामध्ये असूनही एवढा एकटा होईन अस वाटल नव्हत....

इथवर येऊन पुन्हा परत मागे फिराव लागेल,
तू नसताना अस एकट्याला जगाव लगेल अस वाटल नव्हत...

जवळ असूनही एवढ्या दूर तू जाशील ,
जीवन असा ही एक खेळ खेळेल असही कधी वाटल नव्हत...