Saturday, August 16, 2008

कसा तू ?

केसतच तिच्या अडकून पडलास तू
तुलाच कळाले नाही कसा गुंतत गेलास तू !
गालवरच्या त्या लालीने हरवून गेलास सारे तू
पण कसा अशा खोल दरीत उतरत आहेस तू?
अस्मित त्या गुलाबी ओठामुळे,
हास्य तुझे कसे विसरलास तू ?
स्वप्ने तिची रंगवून हातात तिचा हात घेऊन
कोणापासून तरी दूर चाललास तू
आधार देणारे इतरही आहेत
मग कशाला हवाय आधार तिचाच?
आता तरी बाहेर पड या कोशातून
आनंदच भरलाय या जीवानातून!!!

No comments: